Pimpri News : कच्च्या तेलाचे दर कमी असताना पेट्रोल महाग का? :  काँग्रेसचे शहराध्यक्ष  सचिन साठे  यांचा सवाल

Pimpri News : कच्या तेलाचे दर कमी असताना पेट्रोल महाग का? :  काँग्रेसचे शहराध्यक्ष  सचिन साठे  यांचा सवाल
Pckhabar- मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे. त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्यातेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकार मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवत आहे. महाराष्ट्रात तर पेट्रोल शंभर रुपये लिटर पेक्षा जास्त महाग झाले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत आहे. या भाववाढीवर नियंत्रण मिळवले नाही, तर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा पिंपरी चिंचवड  काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.
इंधन व भाववाढीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सोमवारी शहरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. शहराध्यक्ष साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख येथिल भारत पेट्रोलियमच्या पंपासमोर यासह विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात आंदोलन करण्यात आले. विष्णूपंत नेवाळे,  बाळासाहेब साळुंखे, परशूराम गुंजाळ, सुदाम ढोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, जितेंद्र देहाडे,  शाम आगरवाल, शहाबुद्दीन शेख, मयुर जयस्वाल, सुनिल राऊत, अक्षय शहरकर, विशाल कसबे, मकरध्वज यादव, गौरव चौधरी, चंद्रशेखर जाधव, माधव पुरी, प्रविण पवार, वैभर किरवे, सुरेश बारणे, नितीन पाटील, संदेश बोर्डे, लक्ष्मण रुपनर, समाधान सोरटे, हिरामण खवळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी साठे म्हणाले की, केंद्र सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाववाढ करुन त्रास देऊन कात्रीत पकडण्याचा प्रकार केला आहे असे साठे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *