Article By Dr. Ankush Jadhav : पर्यावरण, कोरोना आणि मनुष्य…!

Article By Dr. Ankush Jadhav : पर्यावरण, कोरोना आणि मनुष्य…!
Pckhabar- ” पर्यावरण संरक्षण व वातावरणातील स्वच्छता” हा संदेश जगभर जाऊन समाजात, देशात या विषयी जागृती निर्माण व्हावी. यासाठी दरवर्षी 5 जूनला “जागतिक पर्यावरण दिवस” जगभर साजरा केला जातो.
Healthy surrounding makes healthy people, पर्यावरण अर्थात सार्वजनिक आरोग्य चांगले असेल तर लोक निरोगी राहतील, हे जागतिक आरोग्य संघटनेने १९५२ सलीच घोषित केले आहे.

मानवी जीवन स्वस्थ्य, आरोग्यपूर्ण व स्वच्छंद होण्यासाठी, जगण्यासाठी प्रदूषण मुक्त वातावरणाची अत्यंत आवश्यकता असते. परंतु विकासाच्या नावाखाली सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले. परिणामी सर्वच प्रकारच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. परंपरागत काचऱ्याबरोबरच टी. व्ही.,
मोबाईल इ.सारख्या ई.कचऱ्याची निर्मिती व वाढ मोठया प्रमाणावर झाली असून ही एक नवीन समस्या निर्माण होऊन या सारख्या वाढत्या प्रदूषणामुळे वातावरण अस्वच्छ, प्रदूषित झाले. आयुर्वेद शास्त्रात (वायु:, उदकं:, देश:काल इ./) वायू, पाणी, देश-भूमी व काळ हे दूषित झाल्यास त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या सजीवांवर होऊन अनेक प्रकारच्या संक्रमक रोगांचे प्रमाण वाढते, हे स्पष्ट केले आहे. दुर्दैवाने आज हेच झाले आहे. गेले दीड वर्षभर न दिसणाऱ्या करोना विषाणूने सर्व जगाला मेटाकुटीला आणले आहे. लाटांवर लाटा येत आहेत. पहिली संपली म्हणून थोडा श्वास सोडला तर दुसरी आली व आता तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.यात लाखो लोक मेले, काहींना बरे झाल्यावर अन्य दुष्परिणाम झाले.

संक्रमक रोगांच्या विरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १९५६ साली Destroy disease carrying insects. रोगसंक्रमन करणाऱ्या कीटकांचा नायनाट करा असा संदेश दिला होता. परंतु इतक्या वर्षानंतर ही आज काय स्थिती आहे.?दूषित, अस्वच्छ मुळे कीटकांचा नायनाट राहिला दूरच उलट त्याचे प्रमाण वाढले. याही पूर्वी १९५३ साली जागतिक आरोग्य संघटनेने “आरोग्य हीच संपत्ती”(Health is wealth) हे घोष वाक्य जाहीर केले होते. परंतु आरोग्य ही संपत्ती केव्हा?आजूबाजूचे वातावरण स्वच्छ, निरोगी असेल तेव्हा. ते जर अस्वच्छ असेल तर वैयक्तिक आरोग्य कितीही चांगले ठेवले तरी सार्वजनिक अस्वच्छतेचा परिणाम हा वैयक्तिक आरोग्यावर ही होतोच. ही वस्तुस्थिती व वास्तव आहे.

कोरोनाच्या महासाथीत हे सर्वच प्रश्न उपस्थित होत आहेत, झाले आहेत. करोनाला किती ही प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला तरी तो पूर्ण नष्ट होणार नाही, असे अनेक तज्ञ म्हणू लागले आहेत. कोरोना बरोबरच जगायला शिका, कोरोना आपल्या जीवनाचे एक अंग आहे असे समजा. असे जागतिक आरोग्य संघटना गेल्या वर्ष्यापासून म्हणत आहे व त्याचा प्रत्यय ही आता कोरोनाच्या येणाऱ्या लाटांमुळे येऊ लागला आहे.

यासाठी एकाच उपाय आरोग्य व स्वच्छतेसाठी एकत्रित प्रयत्न करणे. आपली स्वतः ची, घराच्या स्वच्छतेची काळजी स्वतः च घेणे. प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतः ची, आपल्या घराची काळजी स्वतः घेणे, विविध झाडे लावणे, व पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्याचा श्री गणेशा स्वतः पासून करून करोना पासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे. कारण आपल्या व समाजाच्या आरोग्यासाठी स्वच्छते बरोबरच, वातावरण ही स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे आहे.

स्वच्छ पर्यावरणाने जीवाणू, विषाणू, अपायकारक कीटक नष्ट होऊन कोरोना, फ्लू इ.सारखे संक्रमक रोगांसहित अन्य सर्व प्रकारचे रोग होण्याची फार कमी असते व झालेच तर त्यांची तीव्रता फार कमी असते. “पर्यावरणाचे रक्षण करून प्रदूषण मुक्त होऊन निरोगी आयुष्य जगूया”

डॉ. अंकुश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *