Wakad Crime News : मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही, बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

ही बातमी शेअर करा.

Wakad Crime News : मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही, बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

रेरा प्राधिकरणाला फ्लॅट धारकांच्या बनावट स्वाक्षरीचे संमती पत्र सादर करून फसवणूक
Pckhabar- ठरलेल्या मुदतीत गृह प्रकल्पाचे काम पूर्ण न करता फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकाची फसवणूक करणार्‍या एका बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 ऑक्टोबर 2017 ते 3 जून 2021 या कालावधीत पुनावळे येथे घडला.
उमेश मनोहरराव वाकोडे (रा. आदर्शनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे. याप्रकरणी नीलकंठ श्रीपतराव वाघमारे (वय 38, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी वझरकर असोसिएट्स (प्रमोटर्स अँड बिल्डर्स)चे मालक, भागीदार बिल्डर यांनी त्यांच्या लक्ष्मी व्हीला या गृह प्रकल्पामध्ये 501 याा फ्लॅटची खरेदी केली होती. फ्लॅटसाठी त्यांनी  26 लाख 74 हजार रुपये आरोपीला दिले होते. आरोपीने दिलेल्या मुदतीत गृह प्रकल्पाचे काम पूर्ण न करता ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेरा प्राधिकरणाकडे अर्ज सादर करून त्यासोबत फिर्यादी यांच्यासह इतर फ्लॅट धारकांच्या बनावट स्वाक्षरीचे संमती पत्र सादर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


ही बातमी शेअर करा.