Dehu News : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ऑनलाईन बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांचा सहभाग

Dehu News : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ऑनलाईन बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांचा सहभाग
Pckhabar- ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांशी रविवारी संवाद साधला. या ऑनलाईन बैठकीत पुणे जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शैलाताई खंडागळे यांनी सहभाग घेतला होता.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली.

या ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र सरकार मोठ्या हिंमतीने कोरोनाची लढाई लढत आहे. कोरोनामुक्तीसाठी ‘कोरोनामुक्त गाव दक्षता’ समिती स्थापन कारणाचे निर्देश दिले. बैठकीची सांगता खासदार अनिल देसाई यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *