Dighi News : संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ध्वजारोहण

Dighi News : संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ध्वजारोहण
Pckhabar-दिघीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवनगरी येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

मेजर सुरज वानखडे आणि सुनिल ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश आल्हाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी खाडे यांनी केले तर सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास अध्यक्ष समाधान कांबळे, आनंद काशीद, हरीभाऊ लबडे, सुनील काकडे, संतोष जाधव, रवींद्र पोहरे, अरविंद कदम, सुरेश साळवी, प्रशांत कुऱ्हाडे, मुरलीधर देशमुख, वामन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मिठाई वाटण्यात आली. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *