Wakad Crime News : बाप लेकाने महिलेची केली 25 लाखांची फसवणूक

Wakad Crime News : बाप लेकाने महिलेची केली 25 लाखांची फसवणूक
Pckhabar-महिलेकडून 25 लाख रूपये घेऊन त्या पैशातून अंबरनाथ येथे फ्ॅलट खरेदीकरून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बाप लेकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज मुरलीधर जाधव, महेश मनोज जाधव (रा. रानमळा, कडूस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रहाटणी येथील एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप-लेकाने फिर्यादी महिलेकडून 25 लाख रूपये घेतले होते. त्या पैशांतून आरोपींनी अंबरनाथ येथील जिवदानी अपार्टमेंटमध्ये फ्ॅलट घेत स्वतःच्या नावे खरेदी घेतला. महिलेचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *