Dehu News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देहू भाजपतर्फे फळ वाटप
Pckhabar-राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देहू विठ्ठलनगर मधील विश्वकल्याण मानव सेवा संस्था तसेच ग्रेथसेमने वृद्ध आश्रम येथे देहू शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने फळ वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज शिरसागर यांनी या भेटीचा स्विकार केला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, ज्येष्ठ नेते सुदाम मराठे, माजी उपसरपंच संतोष हगवणे, देहू भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, संजय जंबुकर , उपाध्यक्ष सचिन काळोखे सरचिटणीस सागर मुसूडगे, किसान आघाडीचे अध्यक्ष रविंद्र काळोखे, ओबीसी सेलचे अध्यक्ष संदीप परंडवाल, प्रविण हगवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.















Leave a Reply