Pimpri News : सायकल वारीतून ‘विठ्ठलाला साकडे’

Pckhabar-विठूराया .., सावळे सुंदर , रुप मनोहर ..!
रहो निरंतर , ह्रदयी माझे ..!! कोरोना महामारीचे देशावरील संकट कायमचे दूर होऊन पुन्हा हरिनामाच्या जयघोषात , उत्साहात ज्ञानीयांचा राजा गुरु महाराज संत ज्ञानेश्वर पालखी पायीवारी सोहळा सुरु व्हावा, यासाठी श्री क्षेत्र आळंदी-दिवे घाट-श्री क्षेत्र आळंदी सायकल वारीच्या माध्यमातून विठ्ठलाला सायकल पटू दत्ता आनंदा घुले यांनी साकडे घातले आहे.
2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे महाराष्ट्राची
पायी वारीची परंपरा खंडीत झाली आहे. इतिहासामध्ये प्रथम 2020 आणि 2021 मध्ये या दोन वर्षांमध्ये पालखी सोहळा बसने पंढरपूरला नेला आहे. हा क्षण समस्त महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय वेदनादायी आहे.
त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर दुर होऊन पुढील वर्षी मोठ्या उत्साहात पायी वारी सोहळा होण्यासाठी घुले यांनी विठ्ठलाला साकडे घातले.













Leave a Reply