Bhosari Crime News : मोबाईलवर बोलत चालणे तरूणाला पडले महाग

Bhosari Crime News : मोबाईलवर बोलत चालणे तरूणाला पडले महाग
Pckhabar-मोबाईलवर बोलत चालत जाणार्‍या तरूणाच्या हातातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. ही घटना भोसरी एमआयडीसीमध्ये घडली.
ज्ञानेश्वर बालाजी घोरगंड (वय-23, रा. चिखली) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्वर हा भोसरी एमआयडीसीमधील अल्ट्रा इंजिनियर कंपनीसमोरून मोबाईलवर बोलत पायी चालला होता. पाठीमागून आलल्या दुचाकीवरील तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील रेडमी नोट-7 हा दहा हजारांचा मोबाईल हिसकावला. फौजदार चव्हाण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *