Pimpri Crime News : अर्ध्या किमतीत 32 गाड्या देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला साडेसात लाखांचा गंडा
Pckhabar- ’मी बजाज कंपनीमध्ये मोठा ऑफिसर म्हणून नोकरीला आहे. मी कंपनीमधून तुम्हाला अर्धा किमतीत 32 गाड्या काढून देतो’ असे अमिष दाखवून एका व्यावसायिकाची साडेसात लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला.
अविनाश जाधवाणी (वय-25), आकाश जाधवानी (वय-21, दोघे रा. केसल सोसायटी, पिंपरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक शंकरलाल लालचंद बखत्यारपुरी (वय-50, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोन्ही भावांनी संगमत करून ’मी बजाज कंपनीमध्ये मोठा ऑफिसर म्हणून नोकरीला आहे. मी कंपनीमधून तुम्हाला अर्धा किमतीत 32 गाड्या काढून देतो’ असे अमिष फिर्यादी यांना दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 7 लाख 60 हजार रूपये घेतले. मात्र, गाड्या न देताच त्यांची फसवणूक केली. फौजदार कोकाटे तपास करत आहेत.















Leave a Reply