Bhosari Crime News : 10 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा
Pckhabar- विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण करून आई-वडिलांकडून 10 लाख रूपये आणण्याची मागणी करत शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत इचलकरंजी येथे घडला.
याप्रकरणी विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुशांत सुनिल नगरकर (वय-27), दिर सचि सुनिल नगरकर (वय-31), नितीन सुनिल नगरकर (वय-29), एक महिला, चुलत सासरे नरेश वसंत नगरकर (वय-55, सर्व रा. इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण केली. तसेच आई-वडिलांकडून 10 लाख रूपये आणण्याची मागणी करत शारिरीक आणि मानसिक छळ केला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Bhosari Crime News : 10 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा















Leave a Reply