Chinchwad Crime News: रिक्षा, मोटारीची काच फोडत कोयते हवेत फिरवून दहशत, दोघांना अटक
Pckhabar-आरडाओरड करत आलेल्या तिघांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवून 700 रूपयांची रोकड लुटत एका रिक्षाची व मोटारीची काच फोडून कोयते हवेत फिरवत दहशत माजविली. हा प्रकार रविवारी रात्री साडेबारा वाजता चिंचवड, पत्राशेड झोपडपट्टी येथे घडला. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
किरण पवार, अविनाश साळवे (रा. लिंकरोड, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रोहित ऊर्फ जाद्या साळवे हा पसार झाला आहे. याप्रकरणी कोमल बाबु खैरारिया (वय-24, पत्राशेड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्राशेड परिसरात आरडा ओरड करत फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 700 रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. (एमएच12, एफ. झेड 6411) या रिक्षाची व लिंक रोडवरील पुलाखालील (एमएच-14, एपी 4839) या मोटारीची काच फोडली. हवेत कोयते फिरवत दहशत माजविली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
Chinchwad Crime News: रिक्षा, मोटारीची काच फोडत कोयते हवेत फिरवून दहशत, दोघांना अटक















Leave a Reply