Hinjewadi crime news: दारू पाजून महिलेवर अत्याचार

Hinjewadi crime news: दारू पाजून महिलेवर अत्याचार
Pckhabar-टिडर अ‍ॅपवरून ओळख झालेल्या महिलेला हॉटेलमध्ये घेऊन जात तरूणाने दारू पाजली. तसेच जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना हिंजवडीतील एफएमएल हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे.
अभिजीत सिताराम वाघ (वय-31, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला व आरोपी अभिजीत यांची टिडर अ‍ॅपवर ओळख झाली. आरोपीने महिलेला हिंजवडीतील एफएमएल या हॉटेलमध्ये  घेऊन गेला. तेथे तिला दारू पाजून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिडीत महिलेने याला विरोध केल्यानंतर डोळ्यावर, कानावर, तोंडावर मारहाण करून अत्याचार केला. फौजदार संगिता गोडे तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *