Bhosari news : ‘संविधानाचा सन्मान ठेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची काळाची गरज’: प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

Bhosari news : ‘संविधानाचा सन्मान ठेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची काळाची गरज’: प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

Pckhabar-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयात  26 नोव्हेंबर 2020 रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधाकर बैसाने यांनी केले . त्यात त्यांनी संविधान समितीच्या ऐतिहासिक घडामोडीचा आढावा घेतला तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस उजाळा दिला. भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रा. महालक्ष्मी शिरसाट यांनी सरनाम्याचे पालन करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात  संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगरिया यांनी भारतीय संविधान हे  सर्वोच्च कायद्याचा संच आहे त्यामुळे कोणत्याही उच्च पदावरील व्यक्तीने व राजकीय नेत्याने जर कायद्याचे उल्लंघन केले तर त्यालाही त्याची शिक्षा  संविधानाच्या चौकटीत मिळते. कायद्यासमोर गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्व व्यक्ती समान आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या सर्व नागरिकांनि संविधानाचा सन्मान ठेऊन आचरण करण्याची काळाची गरज आहे असा संविधान दिनानिमित्त संदेश देऊन संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाने केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातिल सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. स्वाती वाघ यांनी केले.   कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सदाशिव कांबळे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *