लाकडाच्या सुबक नक्षीकामात विराजमान झालेले सानप यांचे गणराज
Pckhabar- नाशिक येथील रहिवासी मधुकर सानप यांनी याही वर्षी आनंदाने आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. विशेष म्हणजे यावर्षीचा देखावा हा संपूर्णपणे लाकडात केलेला असून त्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आलेले आहे.
सानप हे स्वतः नाशिक येथील निरामय हॉस्पिटल, पंचवटी, नाशिक येथे कार्यरत असून विघ्नहर्ता प्रमाणे ते ही या कोरोना संकटात एखाद्या देवासारखेच या विघ्नाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
नाशिक शहरात गोदावरी नदी असून नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून दर वर्षी ते आपली गणेश मूर्ती ही सेवाभावी संस्थेला दान करतात.















Leave a Reply