निगडे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणपती विराजमान
Pckhabar- देहूगाव, सह्याद्री सोसायटी येथे वास्तव्यास असणाऱ्या दिपक निगडे आणि उषा निगडे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराज विराजमान झाले आहेत. तसेच गौरीईही आल्या होत्या.
त्यांची मुलगी प्राजक्ता आणि मुलगा आदित्य या दोघांनी गौरी-गणपतीची आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई केली.
सण-उत्सवच आपल्या आयुष्यात एक प्रकारचे चैतन्य व ऊर्जा निर्माण करतात, असे मत दिपक निगडे आणि उषा निगडे यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाच्या या जागतिक संकटातून जगाला लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी निगडे परिवाराने श्री गणेशाकडे प्रार्थना केली.













Leave a Reply