युवराज डोके यांच्या घरी गणपती सह गौराई विराजमान
Pckhabar- जाधववाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या युवराज डोके यांच्या घरी गणपती बाप्पासह गौरी देखील विराजमान झाल्या आहेत. डोके यांच्या घरी सात दिवसांचा गणपती बसवला जातो. गेली अनेक वर्ष त्यांच्या घरी बाप्पाची आराधना केली जाते.
डोके यांच्या घरातील गणपतीची आरास तनुजा डोके आणि विजय डोके यांनी केली आहे. यामध्ये घरात तयार केलेल्या विविध वस्तूंचा समावेश आहे. अनेक फुलांचा देखील यामध्ये वापर केला गेला आहे. या फुलांच्या भोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
युवराज डोके यांच्या घरी गणपती सह गौराईचे देखील आगमन होत असते. डोके यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने गौराईची पूजा केली जाते. या गौराईची तीन दिवस रीति रिवाजानुसार आराधना केली जाते. गौराई भोवती आकर्षक अशी सजावट करून त्यांना विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
गौरी गणपतीचा सण म्हणजे घरामध्ये अगदी उत्साहाचे वातावरण असते. या सणाची तयारी करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. गणपतीचे सात दिवस म्हणजे घरामध्ये एक वेगळेच चैतन्य असते, असे सविता डोके यांनी pckhabar शी बोलताना सांगितले.















Leave a Reply