पिंपरीतील ज्ञानेश्वर सोनावणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान

पिंपरीतील ज्ञानेश्वर सोनावणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान
Pckhabar- पिंपरी गावात वास्तव्यास असलेले ज्ञानेश्वर सोनावणे यांच्या घरी आकर्षक सजावटीमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत.

ही सजावट प्रेरणा सोनावणे हिने केली आहे. यामध्ये तिने स्वतः कागदी फुले तयार करून त्यांची आकर्षक सजावट केली आहे.

या सजावटीमध्ये विविध रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. या फुलांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या गणपतीच्या दहा दिवसांमध्ये घरामध्ये प्रसन्न वातावरण असते, असे सुरेखा सोनावणे यांनी pckhabar शी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या या जागतिक महामारीचे जगावरील हे विघ्न दुर करण्यासाठी सोनवणे परिवाराने विघ्नहर्त्याला साकडे घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *