Pckhabar- चिंचवड येथील प्रसन्न हांडोरे व कुटुंबीय दरवर्षी गणेशाची स्थापना करतात. दगडूशेठ गणपतीवर श्रद्धा असल्यामुळे त्यांची मूर्ती ही दगडूशेठचीच असते. यंदा करोना संकटामुळे त्यांनी सजावट साधीच ठेवली आहे.
कोरोनाचे जागतिक संकट निवारण करण्यासाठी हांडोरो परिवाराने गणेशाला साकडे घालते आहे. त्यांची दोन्ही मुले सोसायटीच्या ढोल पथकात व इतर कार्यक्रमात हिरारीने सहभागी होतात, पण यावर्षी सोसायटीचा उत्सव साधेपणानेच साजरा होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी दरवर्षी गणेश मूर्तीचे विसर्जन न करता दान करण्यात येते, असेही प्रसन्न हांडोरे यांनी सांगितले.















Leave a Reply