नाशिक येथील अक्षय आहेर यांच्या बाप्पांची पर्यावरण पूरक सजावट
Pckhabar- नाशिक गंगापूर रोड, नवीन पंडित कॉलनी येथील रहिवासी अक्षय मधुकर आहेर यांनी कोरोनाच्या संकटामुळे बाप्पांची मूर्ती लहान आणली आहे. सजावट पण पर्यावरणपूर्वक म्हणजेच विटांची केली आहे.
याबाबत अक्षय मधुकर आहेर म्हणाले, बाप्पांचे आगमन हा खूप आनंदाचा व कौतुकाचा सोहळा असतो. दरवर्षी आम्ही गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता कृत्रिम तलावात विसर्जन करून दान करत असतो. ‘देव द्या देवपण घ्या’ या उक्तीचा आनंद पण घेत असतो म्हणजे बाप्पा येतांना व जाताना ही आनंद देतात.
कोरोनाचे संकट असतानाही बाप्पांच्या आगमनासाठी असलेला लोकांचा उत्साह दांडगा होता. हाच उत्साह व त्या मागील असणारी सकारात्मक भावना यामुळे लवकरच संपूर्ण जग कोरोनातून मुक्त होईल अशी आशा आहेर परिवारातील सदस्यांनी व्यक्त केली आहे.















Leave a Reply