कराड येथील जयसिंग कदम यांचा पर्यावरण पूरक गणपती बाप्पा
Pckhabar- सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी असणारे जयसिंग कदम यांच्या घरी पर्यावरण पूरक गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या घरी गेल्या 12 वर्षांपासून अखंडपणे गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.
गणपतीची सजावट विविध फुलांनी केली गेली आहे.
या सजावटीमध्ये विविध रंगाच्या जास्वंदीच्या फुलांचा वापर केला गेला आहे. ही सजावट जयसिंग कदम आणि त्यांची मुलगी जिज्ञासा आणि इशानी कदम यांनी केली आहे.
कदम यांच्या घरी दरवर्षी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि मूर्तीचे घरातच विसर्जन करून त्यामध्ये एक रोप लावले जाते, अशी माहिती जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन , सातारा येथील प्राचार्य विश्रांती कदम यांनी Pc khabar शी बोलताना दिली.















Leave a Reply