गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात आरोग्य जनजागृती
Pckhabar- चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या श्री गणपतीची प्रतिष्ठापना आज (शनिवार) सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे या मुहूर्तावर मंडळाचे मार्गदर्शक, ह.भ.प. रामदास महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे 42 वर्ष आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात आरोग्य जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्लाझ्मा नोंदणी आणि प्रदान हा उपक्रम तसेच आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दररोज आलटून पालटून मंडळातील ज्येष्ठ आणि नवीन सभासदांच्या हातून श्रींची सपत्नीक पूजा करण्यात येईल. गणेशोत्सवातील संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन हे सोशल डिस्टंन्सिगचे काटेकोर पालन करून तसेच मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडेल अशा प्रकारे करण्यात आलेले आहे, अशी माहिती गांधी पेठ तालीम मित्रमंडळाचे संस्थापक-अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे आणि उत्सवप्रमुख विपुल नेवाळे यांनी दिली आहे.













Leave a Reply