सासूने दिलेल्या सहा लाख रूपयांचा सूनेने केला अपहार  

सासूने दिलेल्या सहा लाख रूपयांचा सूनेने केला अपहार  
Pckhabar- फ्लॅट घेण्यासाठी सासूने सुनेकडे सहा लाख रुपये दिले. ती रक्कम फ्लॅट घेण्यासाठी गुंतवून पुन्हा फ्लॅट घेण्याचे रद्द करून बांधकाम व्यावसायिकाकडून सर्व पैसे घेऊन अपहार केला. पैसे घेऊन सून माहेरी निघून गेली. पतीने पैसे मागण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पत्नी, तिचे वडील, आई आणि भावाने त्यांना जिवे मारण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला. हा प्रकार वाकड येथे घडला.

याप्रकरणी सासू शारदा अशोक नागवाणी (वय 62, रा. पुनावळे, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सून हिना अशोक रोरा, सुनेची आई मेनका अशोक रोरा, सुनेचे वडील अशोक रोरा, सुनेचा भाऊ आशिष अशोक रोरा (सर्व रा. ग्रेड लष्कर ग्वालियर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा यांनी सून हिनाकडे सहा लाख रुपये दिले. सर्व रक्कम बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली. दरम्यान, फिर्यादी शारदा यांच्या कौटुंबिक कारणांमुळे फ्लॅट घेण्याचे रद्द झाले. फ्लॅट घ्यायचे रद्द झाल्याने बुकिंगसाठी दिलेली रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली असता व्यावसायिकाने सून हिना हिच्या बँक खात्यावर पाठवून दिली. ही सर्व रक्कम घेऊन सून तिच्या माहेरी मध्यप्रदेश येथे निघून गेली. शारदा यांचा मुलगा वरुण यांनी पत्नी हिनाकडे रक्कम मागितली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच ‘आम्ही तुला पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू पैसे घेण्यासाठी ग्वाल्हेरला आल्यावर तुला ठार मारून टाकीन’ अशी आरोपींनी वरूण यांना धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *