Pimpri Corona news: 71 जणांचा मृत्यू, 2 हजार 492 नवीन रुग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात 2 हजार 417 आणि महापालिका हद्दीबाहेरील 75 अशा 2 हजार 492 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. 71 जणांचा मृत्यू झाला. तर 833 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 1 लाख 95 हजार 929 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 69 हजार 235 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2551 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 1141 अशा 3692 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. 7 हजार 619 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 43 हजार 191 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.















Leave a Reply