Pimpri Corona news: कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू, 2 हजार 394 नवे रूग्ण, एकाच दिवशी 2261 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू, 2 हजार 394 नवे रूग्ण, एकाच दिवशी 2261 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून शनिवारी शहरात 2 हजार 239 तर हद्दीबाहेरील 155 असे 2394  नवे रूग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी तब्बल 28 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर 2 हजार 261 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 65 हजार 367 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 37 हजार 942 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 158 तर हद्दीबाहेरील 874 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 8 हजार 647 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 5 हजार 40 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 4 हजार 938 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 248 घरांना भेटी देऊन 3 हजार 815 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 301 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2  हजार 74 करण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांनंतर प्रथमच एकाच दिवशी 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 पुरूष तर 13 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *