Pimpri Corona news: कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू, 2 हजार 396 नवे रूग्ण

Pimpri Corona news: कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू, 2 हजार 396 नवे रूग्ण,
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरात दिड हजारच्या पुढे वाढणारी रूग्ण संख्या आता अडीच हजाराच्या जवळ गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून  गुरूवारी शहरात 2 हजार 351 तर हद्दीबाहेरील 45 असे 2396  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी तब्बल 21 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 453 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 61 हजार 119 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 33 हजार 839 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 122 तर हद्दीबाहेरील 859 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरूवारी 15 हजार 578 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 12 हजार 942 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 3 हजार 25 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 333 घरांना भेटी देऊन 4 हजार 211 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 319 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2  हजार 423 करण्यात आले आहेत.

दरम्यान, शहरात कोरोना चाचण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. गुरूवारी तब्बल 15 हजार 578 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे कोरोना रूग्ण संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *