Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 2 हजार 784 नवे रूग्ण; 2 हजार 257 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 2 हजार 784 नवे रूग्ण; 2 हजार 257 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 10 दिवसांपासून शहरात दिड हजारच्या पुढे वाढणारी रूग्ण संख्या आता तीन हजाराच्या जवळ गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून बुधवारी शहरात 2 हजार 784 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 16 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 2 हजार 257 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 58 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 32 हजार 386 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 107 तर हद्दीबाहेरील 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 8 हजार 319 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.

4 हजार 547 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 740 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 546 घरांना भेटी देऊन 4 हजार 946 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 301 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2  हजार 420 करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *