Bhosari news: प्राचार्य सदाशिव कांबळे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर
Pckhabar- “राष्ट्रीय बंधुता परिषद आणि काषाय प्रकाशन” पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
२३ जानेवारी २०२१ रोजी डेक्कन पुणे येथे भव्य कार्यक्रमात मराठी साहित्यातील जेष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बंधुताचार्य, प्रकाश रोकडे असणार आहेत.
स्वागताध्यक्ष-मधुश्रीताई ओव्हाळ करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्रा. डाॅ. अशोककुमार पगारिया असणार आहेत. बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनीताई रोकडे या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.















Leave a Reply