Bhosari crime news : एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला 16 लाखांचा गुटखा
Pckhabar- गोडावूनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी सोळा लाख 75 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बार्हाडेवस्ती येथे केली.
कार्तिक दळवी (वय 22, सध्या रा. बोर्हाडेवस्ती, मोशी. मूळ रा. मोताळा, बुलढाणा), किरण कोठारी (रा. घरकुल, चिखली), गोपाल पाटील (रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दळवी यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. आरोपींनी बोर्हाडेवस्ती, मोशी येथील एका गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा करून ठेवल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून आरोपी दळवी यास अटक केली. तसेच, गोडावूनमध्ये लपवून ठेवलेला गुटखा आणि टेम्पो असा अठरा लाख 75 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दळवी याचे दोन साथीदार कोठारी आणि पाटील फरार झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
Bhosari crime news : एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला 16 लाखांचा गुटखा















Leave a Reply