Pimpri Corona News: कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या 90 हजार पार, आज 179 नवीन रुग्णांची नोंद

Pimpri Corona News: कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या 90 हजार पार, आज 179 नवीन रुग्णांची नोंद
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 179 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 90 हजार पार झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 856 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1577 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 652 अशा 2229 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 628 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 966 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील चार आणि पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये काळभोरनगर येथील 48 वर्षीय पुरुष, थेरगावातील 57 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 80 वर्षीय महिला आणि आळंदीतील 86 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *