Sangvi news : सणासुदीच्या काळात भटक्या मेंढपाळावर उपासमारीची वेळ
Pckhabar- कोरोना महामारीमुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या महामारीमुळे धनगर समाजातील भटकंती करून पोट भरण्याऱ्या मेंढपाळाची दयनीय अवस्था झाली आहे.
मेंढी- शेळी पालन शेतीला पूरक व्यवसाय मानला जातो, पण भटकंती करणाऱ्या मेंढपाळाकडे शेती नसते ,वर्षभरात, डोंगरदऱ्यात,गावोगावी किंवा चारा मिळेल त्या ठिकाणी आठ दिवस ते तीन- चार महीने एकाच ठिकाणी राहुट्या (पाल) ठोकून मुक्काम केला जातो. उन्हाळ्यात उघडयावर संसार थाटतात,एकावेळी तीन ते चार कुटुंब सोबतच आसतात शेळ्या, मेंढ्या, लोकरी विकुन कुटुंबाची गुजरान करतात.थोडया फार प्रमाणात कोंबड्या ही पाळतात. स्वःताची व मेंढ्याची रक्षण करण्यासाठी कुत्रे पाळली जातात.
शासनाने “राजे यशवंत होळकर योजना” मेंढपाळासाठी केली आहे. पुण्यश्लोक आहील्याबाई होळकर महाराष्ट्र शेळी-मेंढ्या पालन विकास महामंडळ कार्यरत आहे, पण हे भटकंती करणारे मेंढपाळ या योजणेपासुन अनभिज्ञ असतात. त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांची माहिती नसते. यांच्याकडे सध्या उस्मानाबादी, संगमनेरी, माडग्याळ,जातीच्या शेळ्या, मेंढ्या आसतात.
औध जिल्हा रूग्णालयातील आवारात गेल्या तीन महीन्यापासुन कोरोना च्या काळात सिताराम तांबे, प्रभु तांबे ,व त्यांचे ईतर भाऊ ही कुटुंबासह राहत आहेत. सर्वाचे दहा ते बारा लहान मोठे मुले आहेत, चार कुत्रे, 50 ते 55 लहाण मोठे कोकरे व करडू (पिल्ले) आहेत. 70 वर्षीय प्रभू तांबे आजही शेळ्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी जात आहेत. थंडीच्या दिवसात ही उघडयावर वरच स्वयंपाक करतात व झोपतात. तांबे यांनी सांगितले की कोरोनाच्या काळात आम्हाला कोणतीही शासनाने मदत केली नाही.
सिताराम तांबे यांनी सांगितले की आम्हाला लिहीता वाचता येत नाही. आमचे मुले ही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेला शासनाने आर्थिक मदत करून आमची दिवाळी गोड करावी.
मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की शासनाने ठोस उपाययोजना करून त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी, त्याचे मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने विकास कुचेकर व आमचे शिष्टमंडळ लवकरच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुख्यमत्री यांना प्रत्यक्ष भेटून, भटकंती मेंढपाळाच्या व्यथा माढणार आहोत.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री, धनंजय मुंडे पाठलेल्या निवेदनावर संस्थाध्यक, विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा सौ संगिता जोगदंड, मुरलीधर दळवी, अँड सचिन काळे, रवि भेंकी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)















Leave a Reply