Pimpri corona News: शहरात 173 नवीन रुग्ण, 121 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 161 आणि पालिका हद्दीबाहेरील 12 अशा 173 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 87 हजार 594 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 246 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1527 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 630 अशा 2157 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 947 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1138 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 4 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात कासारवाडीतील 78 वर्षीय पुरुष, धानोरीतील 40 वर्षीय पुरुष, आंबेगाव येथील 57 वर्षीय पुरुष, पेरणे फाटा येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)















Leave a Reply