Chinchwad news : पुर्णानगर येथे चुघ क्लिनिकतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर

Chinchwad news : पुर्णानगर येथे चुघ क्लिनिकतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर

Pckhabar- पुर्णानगर येथील चुघ क्लिनिक यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि.3) आणि रविवार (दि.4) रोजी आरोग्य शिबिर संपन्न झाले.
यावेळी डॉ. सुरेंद्र चुघ, डॉ.संगिता चुघ, डॉ. अमेय चुघ, डॉ. बिंदिया चुघ, नगरसेविका योगिता नागरगोजे, ज्ञानेश्वर नागरगोजे उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात प्रामुख्याने प्रसुतीपूर्व सल्ला, स्त्रीरोगशास्त्र तपासणी आणि सल्ला, हिमोग्लोबिन, रक्तदाब, मासिक पाळीचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी, केस गळतीच्या  समस्या यांवर  सल्ला देत तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थीच्या भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले. आरोग्य शिबिराला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *