Pimpri Crime news : दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले
Pckhabar- महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडी पिंपरी येथील शासकीय बंगल्याजवळ तीन जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला लुटले.
हरदीपसिंग खेमासिंग जमीनदार (वय 48, रा. आदर्शनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जमीनदार त्यांच्या (एम एच 14, एच सी 7641) या दुचाकीवरून मोरवाडी पिंपरी येथून जात होते. महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्याजवळ आले असता तीन अनोळखी व्यक्तींनी जमीनदार यांच्या दुचाकीला हात करून थांबवले. चोरट्यांनी फिर्यादी जमीनदार यांच्याकडील चार हजारांचा मोबईल फोन, अडीच हजार रुपयांची रोकड असा एकूण साडेसहा हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चोरट्यांनी तिथून पोबारा केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Pimpri Crime news : दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले















Leave a Reply