Hinjewadi crime news : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Pckhabar- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तीन तरूणींची सुटका करत चौघांवर गुन्हा दाखल केला.
गणेश कैलास पवार (वय 20, रा. हॉटेल ग्रॅन्ड मन्नत, येळवंडे वस्ती, हिंजवडी, मूळ औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी फेज एक येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक बनवून एकाला हॉटेलवर पाठवले आणि माहितीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या तीन तरुणींची सुटका केली. हॉटेलचा मॅनेजर आरोपी गणेश पवार आणि त्याच्या अन्य साथीदार मागील 7 ते 8 दिवसांपासून पीडित तरुणींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. आरोपींनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉटसअॅप नंबर प्रसारित केले होते. त्या क्रमांकावर संपर्क केल्यावर ते पिडीत तरुणींचे फोटो पाठवायचे व त्याठिकाणी सौदा झाल्यावर ग्राहकास हॉटेलचा पत्ता देत होते. पोलिसांनी हे रॅकेट उध्वस्त केले आहे.
Hinjewadi crime news : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश















Leave a Reply