तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्याला अटक
Pckhabar- तरुणीला वारंवार त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सप्टेंबर 2019 पासून 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत पाटीलनगर, चिखली येथे घडली आहे.
सर्फराज युनुस पटवेकर (वय 35, रा. काळभोरनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मयत 23 वर्षीय तरुणीला गोड बोलून स्वतःच्या जाळ्यात अडकवले. आरोपीचे लग्न झालेले असतानाही त्याने मयत तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिचा गैरफायदा घेत, धमकी देत तिच्याशी अनैतिक संबध ठेवले. त्यातून तिला मानसिक त्रास देऊन तिच्याकडून वारंवार पैसे घेतले. ते पैसे परत दिले नाहीत. पिडीत तरुणीचे जगणे असह्य झाल्याने तिने 15 सप्टेंबर रोजी पेस्ट कंट्रोलचे औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्याला अटक















Leave a Reply