चिखलीत पावणे दहा लाखांची चोरी
Pckhabar- घराचा दरवाजा उघडा ठेऊन महिला दुसर्या घराच्या बांधकामावर गेल्या असता चोरट्यांनी घरातून 9 लाख 70 हजारांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना शिवतेजनगर, चिखली येथे घडली.
सुमित्रा अमसिध्द खोत (वय 46, रा. शिवतेजनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता फिर्यादी सुमित्रा घराचा दरवाजा उघडा ठेऊन त्यांच्या दुसर्या घराच्या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी चोरट्यांनी घरातून 165 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 9 लाख 70 हजारांचा ऐवज चोरुन नेला.
चिखलीत पावणे दहा लाखांची चोरी















Leave a Reply