Pimpri Crime news : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; आणखी तीन दुचाकी, एक टेम्पो चोरला

Pimpri Crime news : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; आणखी तीन दुचाकी, एक टेम्पो चोरला
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी आणखी तीन दुचाकी आणि एक टेम्पो चोरून नेल्याबाबत सोमवारी (दि. 29) वाकड, एमआयडीसी भोसरी, भोसरी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अब्दुल ह्कीय शेख (वय 49, रा. नवी सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख यांची 35 हजारांची मोपेड दुचाकी (एमएच 14, र्ईबी 5617) अज्ञात चोरट्यांनी कस्पटेवस्ती, वाकड येथून चोरून नेली आहे.
सुमित दीपक उत्तेकर (वय 32, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून त्यांची 40 हजारांची दुचाकी (एमएच 14, एचए 1488) चोरून नेली आहे.दाविद देवाशिष पहिलवान (वय 27, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पहिलवान यांची 15 हजारांची दुचाकी (एमएच 14, एचटी 1198) अज्ञात चोरट्यांनी एसटी डेपो रोड, दापोडी येथून चोरून नेली आहे.
हितेश घनशामसिंग चहार (वय 29, रा. मामुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चहार यांचा अडीच लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो (एमएच 14, एचजी 2998)  अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *