Hinjewadi Crime News : पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार चोरण्याचा प्रयत्न

Hinjewadi Crime News : पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार चोरण्याचा प्रयत्न
Pckhabar-कंपनीच्या गेटसमोर मोटारीमध्ये बसलेल्या  चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मोटार चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार टीसीएस कंपनीसमोर हिंजवडी येथे घडला.
योगेश गणेश शिंदे (वय 34, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे मोटार चालविण्याचे काम करतात. ते त्यांच्या मोटारीमध्ये हिंजवडी येथील टीसीएस कंपनीच्या गेटसमोर भाड्याची वाट पाहत थांबले होते. रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तुल शिंदे यांच्या डोक्याला लावले. दुसर्‍या व्यक्तीने त्याच्याकडील पिस्तुल दाखवून शिंदे यांना दम दिला. तर तिसर्‍या व्यक्तीने कोयत्याचा धाक दाखवून शिंदे यांना धमकावले. तिघांनी मिळून शिंदे यांची मोटार चोरून नेण्याचा प्रयत्न केला.  हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *