Bhosari Crime News : पायी जाणार्‍या तरूणाचा मोबाईल हिसकावला

Bhosari Crime News : पायी जाणार्‍या तरूणाचा मोबाईल हिसकावला

Pckhabar- पायी जाणार्‍या तरूणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 10 हजार रूपयांचा मोबाईल, मोबाईल कव्हरमधील दीड हजार रूपये, लायसन्स अशा ऐवज हिसकावून पसार झाले. ही घटना जाधववाडी-मोशी रोडवर शुक्रवारी घडली.

याप्रकरणी अमोल दशरथ शिंदे (वय-24, रा. जाधववाडी, मुळ. सावरगाव, ता. भूम. जि. उस्मानाबाद) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल जाधववाडी-मोशी रोडने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या स्कुटीवरील दोन आरोपीपैंकी एकाने अमोलच्या हातातील 10 हजार रूपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. मोबाईल कव्हरमधील दिड हजार रूपये आणि उस्मानाबाद आरटीओचे लायसन्स घेऊन आरोपी पसार झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मोबाईल चोरीसह आदी लुटीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांना लुटणार्‍या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *