Kasarwadi news: दारू आणण्यासाठी दुचाकी दिली नसल्याने तिघांची युवकाला मारहाण

Kasarwadi news: दारू आणण्यासाठी दुचाकी दिली नसल्याने तिघांची युवकाला मारहाण
Pckhabar– दारू आणण्यासाठी दुचाकी दिली नसल्याचा राग आल्याने तीन जणांनी मिळून एका युवकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री पावणेअकरा वाजता कासारवाडी येथे घडली.

यात मारहाणीत जखमी झालेल्या संदेश शशिकांत शिंदे (वय 25, रा. रामदास जवळकर चाळ, कासारवाडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इऱ्या (वय 19, पूर्ण नाव माहिती नाही), बंटी गावडे (वय 20, पूर्ण नाव माहिती नाही), आरबाज शेख (वय 23, सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी संदेश शिंदे आणि त्यांचा मित्र गणेश हे दोघेजण कासारवाडी येथील एका हॉटेल समोरून जात होते. त्यावेळी आरोपी तिथे थांबले होते. आरोपींनी दारू घेऊन येण्यासाठी संदेश याला दारू आणण्यासाठी त्याची दुचाकी मागितली. त्याने दुचाकी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी संदेश याला सिमेंटच्या गट्टूने मारले.

यात संदेश याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. तर संदेश याचा मित्र गणेश याला हाताने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *