मोलकरणीनेच मालकाच्या पावणेपाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
Pckhabar-मोलकरणीनेच मालकाच्या पावणेपाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला मारल्याची बावधन येथे उघडा उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोलकरणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मृती वासुदेव अधिकारी (वय-40, रा. बावधन) हिचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुभाषचंद कपुरचंद गुप्ता (वय-62, रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता यांच्याकडे आरोपी महिला कामाला आहे. आरोपीने ड्राव्हरमधून कपाटाची चावी घेतली. लाकडी कपाट उघडून 4 लाख 86 हजार 90 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
Hinjewadi Crime News: मोलकरणीनेच मालकाच्या पावणेपाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला















Leave a Reply