Sangvi Crime News: कोरोना आयसीयू वॉर्डमधून रुग्णाचा मोबाईल चोरीला
Pckhabar- कोरोनाच्या आयसीयु वॉर्डमधून अज्ञात चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबाईल चोरून नेला. उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयात घडली आहे.
याप्रकरणी मयत रुग्णाच्या मोठ्या भावाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लहान भावाला (वय 46) कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना फिर्यादी यांच्या भावाचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या भावाचा 12 हजार रुपये किमतीचा मोबईल फोन चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
Sangvi Crime News: कोरोना आयसीयू वॉर्डमधून रुग्णाचा मोबाईल चोरीला















Leave a Reply