Hinjewadi Crime News: सोसायटीच्या आवारात स्पीकर लाऊन धिंगाणा; आठ जणांना अटक

Hinjewadi Crime News: सोसायटीच्या आवारात स्पीकर लाऊन धिंगाणा; आठ जणांना अटक
Pckhabar- कोरोना काळात सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता सोसायटीच्या आवारात स्पीकर लाऊन धिंगाणा घालणार्‍या आठ जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार  एक्झरबिया सोसायटी येथे घडली.
माधव यशवंत काळे, निखील भीमा बनसोडे, अथर्व मनोज मुसमोड, अभिजित सुरेंद्र आमले, मयूर कैलास गोरे, रवींद्र अशोक गरदरे, संकेत पंढरीनाथ भगत, प्रतिक महेश ढोकचौळे व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुधीर दत्तात्रय शिंदे (वय 29, रा. दत्तवाडी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील एक्झरबिया सोसायटीमध्ये एका सलून दुकानासमोर आरोपींनी सार्वजनिक शांततेचा भंग करून स्पीकरवर मोठमोठ्या आवाजात गाणी लाऊन धिंगाणा घातला. कोरोना साथीच्या काळात कोणत्याही प्रकारची काळजी न घेता कोरोनाचा प्रसार करण्यास पोषक वातावरण निर्माण केले. याबाबत फिर्यादी शिंदे यांनी आरोपींना हटकले. यावरून आरोपी माधव याने हॉकी स्टिकने तर अन्य आरोपींनी फिर्यादी यांचा मित्र आकाश प्रधान यांना हाताने मारहाण करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *