सदनिकेचे कुलूप तोडून 21 लाखांंचा ऐवज लंपास

Pckhabar- बंद सदनिकेचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्याने 21 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना वाकडेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली.  

   प्रशांत आमिनभावी (वय 50 रा.वाकडेवाडी पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी आमिनभावी हे वाकडेवाडी येथिल भाले इस्टेट या सदनिकेत वास्तव्यास आहेत. भावाच्या वाढदिवसा निमित्त सोमवारी ते सहकार नगर येथे गेले होते. बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी  बेडरुममधील कपाटातील रोख 3 लाखांची रोकड, 18 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे असा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलिस निरिक्षक(गुन्हे) शफिल पठाण करित आहेत.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *