सार्वजनिक शांततेचा भंग; आठ जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar-सार्वजनिक शांततेचा भंग करून आपसात भांडण करणार्या आठ जणांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालाजीनगर झोपडपट्टी, टेल्को रोड, भोसरी येथे करण्यात आली.
प्यारेलाल हनुमंत कांबळे (वय 25), सुमन हनुमंत कांबळे (वय 45), आम्रपाली सचिन सूर्यवंशी (वय 25), सत्यशीला परमेश्वर कांबळे (वय 30), अविष्कार रामविलास कांबळे (वय 22), शोभा रामविलास कांबळे (वय 48), मंगल संजय गायकवाड (वय 22), वर्षा रामविलास कांबळे (वय 24, सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई संजय भागवत यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्यारेलाल, सुमन, आम्रपाली, सत्यशीला आणि आरोपी अविष्कार, शोभा, मंगल आणि वर्षा हे दोन गटात आपसात भांडण करत होते. मोठमोठ्याने आरडा ओरडा झाल्याने तिथे लोकांची गर्दी जमा झाली. आरोपींनी सार्वजनिक शांततेचा भंग केला असून प्रशासनाच्या आदेशाचे देखील उल्लंघन केले आहे. याबाबत दोन्ही गटातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
सार्वजनिक शांततेचा भंग; आठ जणांवर गुन्हा दाखल















Leave a Reply