जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा  

जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा  
Pckhabar- पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असणार्‍या अनुसुचित जमातीच्या कर्मचारी व अधिकारी यांना विशिष्ट मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणार्‍या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदवी चँरिटेबलच्या अध्यक्षा सुजाता निगळे, विनोद पोरे, पंकज शिंदे, विवेक बारसे, युवराज डावखर यांनी केली आहे.

याबाबत चॅँरिटेबलच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असणार्‍या सर्व विभागीय कर्मचारी व अधिकारी यांचे अनुसूचित जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र सबंधित कार्यालयास सादर न करता कर्मचारी व आधिकारी अनेक वर्षे नोकरी करत आहेत. अशा कर्मचारी व अधिकारी यांच्यावर त्वरीत कारवाई करावी. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनुसुचित जागेवर बोगस कर्मचारी व अधिकारी काम करत असतील तर समाजावर अन्याय होत आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *