अतूट नात्याचे बंधन एका ‘click’ मध्ये कैद!

अतूट नात्याचे बंधन एका ‘click’ मध्ये कैद!
Pckhabar- ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू प्रेमाच्या माळा’ या गीतातील ओळी प्रमाणे चार पिढ्यांतील अंतर एका फोटोमध्ये कैद करण्यात आले आहे. निगडी, यमुनानगर येथे वास्तव्यास असलेल्या राऊत परिवारातील पणजोबा दत्तात्रय खाशाबा राऊत आणि पणती अनन्या वैभव देवकर यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतूट नात्याचे बंधन एका ‘click’ मध्ये कैद झाले असून पणती पणजोबांच्या पोटावर झोपली आहे.

भारतीय संस्कृती आणि नातेसंबंधांची जगभरात एक चांगली ओळख आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही काळाच्या ओघात लोप पावत चालली असली तरी आजही देशासह महाराष्ट्रात अनेक कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत.  या स्पर्धेच्या जगात आई-वडिल लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, त्यांना घरात ज्येष्ठ नागरिकांची अडचण होते. आज अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तुसडेपणाची वागणूक दिली जाते. त्यामुळे अशा उतारवयात अनेक ज्येष्ठ आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास नको म्हणून वृद्ध आश्रमाची वाट धरतात. मात्र, घरामध्ये नातवंडे असल्यास त्यांचे आणि नातंवडाचे एक वेगळेच ट्युनिंग असते. घरातील मुख्य व्यक्तींच्या वागण्यामुळे लहान मुलांना आजी-आजोबांचे प्रेमाला मुकावे लागते.

मात्र, समाजामध्ये आजही अनेक जण पिढ्यान-पिढ्या एकत्र राहत आहेत.  निगडी, यमुनानगर येथे वास्तव्यास असलेल्या राऊत परिवारातील पणजोबा दत्तात्रय खाशाबा राऊत आणि पणती अनन्या वैभव देवकर यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनन्या ही आपल्या पणजोबाच्या पोटावर अतिशय सुरक्षित ‘फिल’ करत असून हा दुर्मिळ योगा-योगा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *