सातारा येथील इंद्रजित जाधव यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान
Pckhabar- सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खुबी येथे वास्तव्यास असणाऱ्या इंद्रजित जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. मोठया उत्साहात त्यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली.
जाधव यांच्या घरी गणपती सह गौराईचे देखील आगमन झाले होते.
जाधव यांनी गणपती बाप्पाला आकर्षक असे मखर तयार केले आहे. या मखराभोवती फुलांची सजावट केली असून त्याला सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जाधव यांनी गौराईला देखील सुंदर पद्धतीने नटविले होते. गौराईला पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसवण्यात आली होती. ही सर्व सजावट भाग्यश्री जाधव यांनी केली होती. त्यांना साक्षी आणि सौरभ जाधव यांनी सहकार्य केले.
गणपतीच्या काळामध्ये जाधव कुटुंबामध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. या दिवसांमध्ये जाधव कुटुंबाकडून गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते.















Leave a Reply