कराड येथील पृथ्वीराज जाधव यांच्या घरी बाप्पा विराजमान

कराड येथील पृथ्वीराज जाधव यांच्या घरी बाप्पा विराजमान
Pckhabar- सातारा जिल्ह्यातील कराड, खुबी येथे वास्तव्यास असणाऱ्या पृथ्वीराज बापुराव जाधव आणि अर्चना पृथ्वीराज जाधव यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मोठ्या उत्साहात जाधव कुटुंबीयांनी बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना केली.

जाधव यांच्या घरी गौराईचीही प्रतिष्ठापना केली होती. गौराईला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला होता. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. ओंकार आणि शिवराज जाधव यांनी आकर्षक सजावट केली होती.

गणपतीच्या काळामध्ये जाधव कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असते. संपूर्ण कुटुंबीयांकडून गणपती बाप्पाची मनोभावे आराधना केली जाते. जगावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केल्याचे पृथ्वीराज जाधव आणि अर्चना पृथ्वीराज जाधव यांनी pckhabar शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *